रावेरकरांना कापूस केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा


जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा : 433 शेतकर्‍यांची नोंदणी

रावेर : जिल्ह्यात सर्वत्र कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असलेतरी रावेर शहरात मात्र अद्याप खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नानंतर रावेरला खरेदी केंद्र मंजूर झाले मात्र जीनिंगअभावी खरेदीला उशीर होत आहे. तालुक्यातील 433 शेतकर्‍यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली असलीतरी केंद्र सुरू होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.


शेतकर्‍यांची प्रतीक्षा कायम
सीसीआयला कापूस विक्रीसाठी शेतकर्‍यांची प्रतीक्षा कायम आहे. मागीलवर्षी देखील अनेक शेतकर्‍यांचा कापूस खरेदी होण्याआधीच केंद्र बंद पडले होते. यावर्षीदेखील खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अनंत प्रयत्न करावे लागले आहे. याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !