खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


वरणगाव शहरात नगरपालिका ग्रंथालयाला स्पर्धा परीक्षांचे पुस्तके भेट : बोदवड शहरात रुग्णांना फळ वाटप

भुसावळ : राष्ट्रवादीचे सर्वेसवा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळ विभागात विविध कार्यक्रमांचे शनिवारी आयोजन करण्यात आले. वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्याकडून नगरपालिकेच्या ई लायबरीला स्पर्धा परीक्षा भेट देण्यात आली तर बोदवड शहरातील रुग्णांना1 फळ वाटप करण्यात आले.

वरणगावात लायब्ररीला पुस्तके भेट
वरणगाव :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी शनिवारी नगरपरीषदेच्या ई लायबरीमध्ये एमपीएससी, युपीएस्सीचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 18 पुस्तकांचा संच देण्यात आला.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, माजी नगरसेवक विष्णू खोले, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, समाधान चौधरी, बाळासाहेब धनगर, गजानन वंजारी, राजेश चौधरी, पप्पू जकातदार, सुधाकर जावळे, एहसान खान, साजीद कुरेशी, धोंडू भोई, रवींद्र पाटील, अशोक सरोदे, अनिल चौधरी, प्रकाश नारखेडे, अतुल झांबरे, प्रशांत पाटील, इफ्तेखार मिर्जा, पिंटू धोबी, मनोज अग्रवाल, आकाश झोपे, महेश सोनवणे, ऋषी कोलते, मयूर चौधरी, सचिन पाटील, कैलास माळी, लल्ला माळी, उज्वल राणे, ईश्वर पाटील, विनायक शिवरामे आदी उपस्थित होते.


या विद्यार्थ्यांना दिला स्पर्धा परीक्षा संच
प्रसंगी किरण माळी, राहुल भोई, योगेश मराठे, देवेश भोई, आकाश तेली, अविनाश जाधव, राजू वंजारी, पुष्पक माळी, मयूर कपाटे, शुभम रवींद्र महाजन, वैभव हळदे, स्वप्नील देवघाटोळे, महेंद्र मगरे, युवराज कपाटे, राहुल चौधरी, अक्षय सोनार, वैभव राणे, रोशन धनगर, शुभम घुले, निखील महाजन या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संच भेट देण्यात आला.

बोदवड तालुका राष्ट्रवादीतर्फे विविध कार्यक्र
बोदवड :
राष्ट्रवादी काँग्रेस बोदवड तालुक्याच्या वतीने शनिवार खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात राज्यस्तरीय व्हर्चुअल रॅली या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी हॉलमध्ये करण्यात आले. शेलवड येथे बहुद्देशीय विद्यालयाच्या प्रांगणात 200 झाडे लावण्याच्या उपक्रमास शनिवारपासून सुरूवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
फळ वाटपप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ.उध्दवराव पाटील, नगरपंचायत गटनेते देवेंद्र खेवलकर, कैलास चौधरी, मधुकर राणे, शालिग्राम काजळे, विलास देवकर, सईद बागवान, भरत पाटील, दीपक वाणी, प्रदीप बडगुजर, दिनेश माळी, रामदास पाटील, अनिल वराडे, अनिल पाटील, डॉ.ए.एन.काजळे, विजय पालवे, आनंदा पाटील, डॉ.सुधीर पाटील, विनोद पालवे, किशोर माळी, शिवाजी ढोले, प्रमोद धामोडे, दीपक पाटील, सुदर्शन माळी, आबा पाटील, सतीश पाटील, निलेश पाटील, आनंद माळी, वामनराव ताठे, संदीप साळुंखे, किरण माळी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, रविवारी भव्य रक्तदान शिरिाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या शेतकरी हॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती, बोदवड येथे करण्यात आले आहे. जास्तीत-जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.ए.एन काजळे यांनी केले आहे. या शिबिरासाठी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खेवलकर उपस्थित राहणार आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !