वाढत्या महागाईविरोधात बोदवडमध्ये सेनेचा रस्ता रोको आंदोलन


बोदवड : वाढत्या महागाईसह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत बोदवड शहरात शनिवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी चळवळीला पाकिस्तान, चीन येथून प्रोत्साहित केले जात असल्याचे बेताल वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते. या वक्तव्यावर दानवे यांनी माफी मागावी व त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.

रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प
बोदवड शहरातील अमर चौकात शनिवारी दुपारी 12 वाजता झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन खोडके, अल्पसंख्यांक जिल्हा उपप्रमुख कलिम शेख, शांताराम कोळी, हर्षल बडगुजर, संजय महाजन, विनोद पडार, दीपक माळी, अयूब कुरेशी, अजय पाटील, गजानन भोंडेकर, विनोद मोरे, समीर शेख, बंटी पाटील, नईम बागवान, अलीम शेख, योगेश राजपूत, सचिन राजपूत, अमोल व्यवहारे उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !