पाडळसेच्या शेतकर्‍याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू


यावल : तालुक्यातील पाडळसे येथील शेतकर्‍यावर मधमाशांनी हल्ला चढवल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू ओढवला. भागवत भास्कर काठोके (52, रा.पाडळसे, ता.यावल) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. काठोके हे अल्पभूधारक शेतकरी असून जोडधंदा म्हणून ते दुग्ध व्यवसाय करत होते. 11 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शेतामध्ये ते गायीला चराईसाठी घेवून गेले असता दुपारी तीन वाजता त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भुसावळ येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते मात्र रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. काठेके हे जन्मत: मुके होते. घरातील एकमेव कमावती व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, एक विवाहित मुलगा, पत्नी असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !