अंतर्नादतर्फे उद्यापासून पुष्पांजली ऑनलाईन प्रबोधनमाला


प्रथम पुष्प पुण्याचे कवी देवा झिंजाड गुंफणार

भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानची फिरती पुष्पांजली प्रबोधनमाला म्हणजे भुसावळची वैचारीक विश्व व्यापक करणारी चळवळ. दोन वर्षांपासून या उपक्रमातून रसिकांची सांस्कृतिक भूक भागतेय. यंदा तिचं तिसर वर्ष. पण कोरोनाचा काळ असल्याने तिचं स्वरुप काहीसं बदलवावं लागलं आहे. अर्थात यंदा ही प्रबोधनमाला 15, 17 व 19 डिसेंबर असे तीन दिवस ऑनलाइन होते आहे.

यांचा नियोजन समितीत समावेश
प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील यांच्या मातोश्री पुष्पा पाटील यांच्या स्मरणार्थ वैचारीक चर्चेचं दालन या अभिनव अशा उपक्रमाच्या माध्यमातून उघडलं आहे. उपक्रमासाठी जळगाव येथील कला रसिक अजय बढे यांचे सहकार्य लाभत आहे. नियोजन समितीत ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, संजय भटकर, योगेश इंगळे, समाधान जाधव, अमितकुमार पाटील, सुनील वानखेडे, विक्रांत चौधरी, देव सरकटे, शैलेंद्र महाजन, निवृत्ती पाटील, संदीप रायभोळे, राजू वारके, जीवन सपकाळे, हरीष भट, प्रमोद पाटील, भूषण झोपे, ईश्वर पवार, सचिन पाटील, संदीप सपकाळे, मंगेश भावे, प्रा. भाग्यश्री भंगाळे, वंदना भिरूड यांचा समावेश आहे. रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष संदीप पाटील, प्रकल्प प्रमुख अमित चौधरी, समन्वयक प्रा. श्याम दुसाने, सहसमन्वयक आर. डी. सोनवणे यांनी केले आहे.


उद्यापासून प्रबोधन माला
प्रबोधन मालेचे प्रथम पुष्प मंगळवार, 15 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ‘माय-बापाच्या कविता’ या विषयावर देवा झिंजाड (पुणे) गुंफतील. दुसरे पुष्प गुरुवार, 17 रोजी सायंकाळी सहा वाजता ‘संकटे गिळतो बाप माझा’ या विषयावर जीवन महाजन (भुसावळ) गुंफतील तर अखेरचे पुष्प शनिवार, 19 रोजी सायंकाळी सहा वाजता ‘मुकी घरे बोलकी करू या !’ या विषयावर उज्ज्वला सुधीर मोरे (वाशिम) गुंफणार आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !