बोदवडला खासदार पवारांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
बोदवड : राज्यात रक्ताचा तुटवडा न पडल्यास खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी शहरातील कृउबातील शेतकरी हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय, मुंबई तसेच मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जाहीर आवाहनाला प्रतिसाद देत बोदवड तालुक्यात रक्तदान महाशिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यांची होती उपस्थिती
शिबिराला माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी भेट दिली. भरतअप्पा पाटील यांच्या दोन्ही मुलांसहित 29 रक्तदात्यांकडून रक्तदान केले. शिबिरात तालुकाध्यक्ष डॉ.उध्दवराव पाटील, डॉ.सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.ए.एन काजळे, नगरपंचायत गटनेते देवेंद्र खेवलकर, मधुकर राणे, रामदास पाटील, हाजी सईद बागवान, प्रदीप बडगुजर, शालिग्राम काजळे, विलास देवकर, विनोद कोळी, बाळू पाटील, आनंदा पाटील, सतीष पाटील, आबा पाटील, मधुकर पाटील, विजय पालवे, दीपक झाम्बड, सागर जैस्वाल, गोपाल गंगतीरे, वामन ताठे, कल्पेश शर्मा, आनंद माळी, शिवाजी ढोले, लालसिंग पाटील, कडू माळी यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे डॉ.ए.एन काजळे यांनी आभार मानले.


