दुचाकी समोरा-समोर धडकल्या : दोन गंभीर


यावल : चोपडा-यावल मार्गावरील गिरड गावाजावळ दोन दुचाकी एकमेकांवर धडकून झालेल्या अपघात एका महिलेसह पाच जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी दुपारी चार वाजता हा अपघात झाला. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चोपडा-यावल मार्गावर दुचाकी (एम .पी.68 एम.जी.2138) व दुचाकी (एम.एच. 19 8108) यांच्यात समोरा-समोर धडक ाली. या अपघातात सचिन रमेश पावरा (20, वाघझिरा, ता.यावल), ज्योती तुफान बारेला (17, रा.चांगल्या तलाव, ता.चोपडा), श्रीराम बारेला (40), तुकड्याकुमार (25) , ओमप्रकाश कैलास पटेल (42, तुकईथड, जि.खंडवा, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जखमींना उपचारासाठी हलवल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रथमोचार केले तर सचिन बारेला व ओमप्रकाश पटेल यांच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !