बजेट 2021 : सोनं-चांदी आणखी होणार स्वस्त


मोबाईलच्या किंमतीसह कॉटनचे कपडे महागणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत वित्तीय वर्ष 2021-22 साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सोनं-चांदीच्या आयात शुल्कात कपात केल्याने सोनं-चांदी आगामी काळात आणखी स्वस्त होणार आहे तर मोबाईलच्या किंमतीसह कॉटनचे कपडे महागणार आहेत. कोरोनाचं जागतिक संकट असतानाही अनेक गोष्टींवरील आयात कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचं अर्थमंत्री सीतारामन यावेळी म्हणाल्या.

बजेट 2021 : नोकरदारांची निराशा ; इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाहीच



काय होणार स्वस्त?
स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार
सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोनं आणि चांदी आणखी स्वस्त होणार
तांब्याच्या वस्तू
चामड्यापासून बनवलेल्या वस्तू

बजेट 2021 : मद्याचा घोट महागणार !

काय महागणार?
मोबाइलच्या काही पार्ट्सवर कर वाढविण्यात आल्यानं मोबाइलच्या किंमती वाढणार आहेत.
परदेशातून आयात केल्या जाणार्‍या वाहनांच्या सुट्या भागांवरील कर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होणार
परदेशातून आयात केले जाणारे कपडे
कॉटनचे कपडे महागणार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !