रावेर पंचायत समितीत पतीदेवाच्या हस्तक्षेपामुळे कर्मचारी हैराण


रावेर : गेल्या काही दिवसांपासून रावेर पंचायत समितीमध्ये एका महिला पदाधिकार्‍यांच्या पतीदेवाच्या हस्तक्षेप वाढल्याने कर्मचारीवर्ग प्रचंड त्रस्त झाले आहे. दिवसभर पंचायत समितीत बसणार्‍या त्या पतीराजामुळे कर्मचारी पूरते हैराण झाले आहेत. महिला पदाधिकारी असलेल्या बहुतांश ठिकाणी त्यांचे पतीच कारभार चालवित असल्याचा आरोप करण्यात येत असल्याचे सर्वश्रृत आहे. त्यात सत्यता किती आणि टीकेचा सूर किती, याकडे दुर्लक्ष केले तरी अनेक ठिकाणी अशीच स्थिती असल्याचे दिसून येते. शासन महिला व पुरुषांमध्ये भेदभाव न ठेवता समानता दिली आहे.अनेक महत्वाच्या ठिकाणी महिला कारभार बघत आहे परंतु रावेर पंचायत समितीमध्ये एका महील्या पदाधिकार्‍यांच्या पतीदेवाचा हस्तेक्षप वाढल्याने येथील कर्मचारीवर्ग चांगलाच हैराण आहे.

वर कमाईसाठी विभागाला वसूलीचे टार्गेट
एका कर्मचार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रावेर पंचायत समितीमध्ये पतीदेव यांच्याकडून काही विभागाला वरकमाईसाठी ठराविक रक्कम वसूलीचे टार्गेट दिल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे कर्मचारीवर्ग प्रचंड नाखुश आहे. भ्रष्ट्राचार रोखण्याची जबाबदारी असलेलेच भ्रष्ट्राचार करायला भाग पाडत असल्याचीदेखील ओरड कर्मचार्‍यांमध्ये आहे.

भाजपाचा ना…खाने दुंगा नारा केवळ नावालाच
रावेर पंचायत समितीमध्ये भाजपा सत्तेत असून एका महिला पदाधिकारी-याच्या पतीदेवाच्या हस्तेक्षपामुळे पूर्ण पंचायत समितीतील कर्मचारी हैराण झाले आहेत. भाजपाचा मुख्य नारा असलेला ना.. खाऊंगा.. ना खाने दुंगा असला तरी या नार्‍याला काही कर्मचार्‍यांना टार्गेट देऊन या पतीदेवाने हरताळ फासले आहे. याकडे रावेर तालुक्यातील इतर भाजपा पदाधिकारी व विद्यमान पंचायत समिती सदस्यांनी लक्ष घ्यालण्याची मागणी होत आहे.


कॉपी करू नका.