नवरात्रोत्सवात गरबा रासला परवानगी ; राज्य शासनाचे मनपूर्वक आभार
करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत : नियम पाळून उत्सव साजरा करणार
भुसावळ : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटांमुळे सण-उत्सव साजरा करण्यास अनंत मर्यादा आल्या आता मात्र जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असून आगामी दुर्गोत्सव सणात नऊ दिवस दांडीया रास खेळण्यासह स्टॅण्डींग दोन लाऊड स्पीकर लावू देण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत यांनी गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परीषदेत केली होती. करणी सेनेने ही मागणी केली असतानाच राज्य शासनाने नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास मुंबई वगळता परवानगी दिली असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी जाहीर केल्यानंतर भुसावळातील करणी सेनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. शासनाने परवानगी दिल्याने तरुणाईत मोठ्या जल्लोषाचे वातावरण असून आगामी उत्सव शासनाच्या नियमांना अधीन राहून साजरा करण्यात येईल, असे निखील राजपूत म्हणाले.
मागणी मान्य झाल्याचे समाधान : निखील राजपूत
या संदर्भात करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कुठलाही सण-उत्सव नियमांना अधीन राहूनच साजरा करता आला आता मात्र कोरोना नियंत्रणात आल्याने किमान नवरात्रोत्सवात गरबा खेळू देण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी आग्रही मागणी होती व या मागणीची राज्य शासनाने दखल घेतल्याचे समाधान आहे. उत्सवाबाबत शासनाकडून जे आदेश जाहीर होतील त्या आदेशाला अधीन राहून आगामी नवरात्रोत्सव सण साजरा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.



