चिनावल परीसरात शेती मालाची चोरी : सावदा पोलिसांनी दोघांना पकडले


चिनावल : चिनावलसह परीसरात सातत्याने होणार्‍या चोर्‍यानंतर शेतकर्‍यांनी रास्ता रोको करीत पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर अखेर दोन संशयीतांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले यांनी दिली.

शेत माल चोर्‍यांमुळे शेतकरी संतप्त
गेल्या 15 दिवसांपासून चिनावल व परिसरात शेतमालाची चोरी करणार्‍यांनी उच्छाद मांडला असल्याने शेतकरी हतबल आहेत. संतप्त शेतकर्‍यांनी रविवारी दोन तास रास्ता रोको आंदोलनही केले. चोरट्यांना व शेतमाल आणि साहित्याची नासधूस करणार्‍यांना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते, त्यानुसार या परीसरातील सुमारे 45 संशयीत पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत. त्यांचे धरपकड सत्र पोलिसांनी सुरू केले आहे. त्यापैकी दोन संशयीतांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !