जळगाव जिल्ह्यासह राज्यावर अवकाळीचे संकट : 7 व 8 रोजी पावसाची शक्यता


Jalgaon Rain जळगाव : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही भागात 7 आणि 8 मार्च रोजी अवकाळी पावसाचे सावट आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची (rain) शक्यता हवामान विभागाकडून (IMD alerts)वर्तवण्यात आली आहे. राज्यासह जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा 36 अंशांपुढे गेला असून उन्हाचा चटका बसू लागला आहे.

खान्देशात 7 रोजी पावसाची शक्यता
हवामान खात्याने (IMD alerts) जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी 07 मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. तसेच याचदिवशी नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून (IMD alerts) देण्यात आला आहे.






डॉक्टर दाम्पत्यास मारहाण करीत सशस्त्र दरोडा : पाच लाखांचा ऐवज लांबवला 

मंगळवारी या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस
मंगळवारी (8 मार्च) राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दरम्यान पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे.

पिकांना फटका बसण्याची भीती
दरम्यान, काढणीला आलेल्या गहू, हरभर्‍यासह रब्बी हंगामातील अन्य पीकांना या वादळी पावसाचा धोका आहे. वार्‍यामुळे मका पिकाचे नुकसान होण्याची शेतकर्‍यांना धास्ती आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !