अ‍ॅपेतून पडल्याने महिलेचा मृत्यू : चालकाची निर्दोष मुक्तता


यावल : अ‍ॅपे रीक्षातून पडल्याने प्रवासी महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयीत चालकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

पुराव्याअभावी चालकाची निर्दोष सुटका
17 मे 2018 रोजी जायेदा कुर्बान तडवी तसेच त्यांचे नातेवाईक कोळवद, ता.यावल येथून बीडगाव, ता.चोपडा येथे जाण्यासाठी निघाले असताना कोळवद ते यावल दरम्यान बांधेल नाला या ठिकाणी वळणावर रीक्षाचा वेग जास्त असल्याने आरीफा रसूल तडवी या रीक्षातून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रीक्षा चालक संशयीत आरोपी शेखर भागवत सपकाळे-कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व यावल न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. संशयीत आरोपी शेखर भागवत सपकाळे याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. संशयीतातर्फे अ‍ॅड.गौरव कमलसिंग पाटील यांनी काम पाहिले पाटील यांना त्यांचे वडील अ‍ॅड.के.डी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


कॉपी करू नका.