Warsade Grampancyat ACB TRAP वरसाडे ग्रामपंचायतीच्या लाचखोर ग्रामसेवकासह सरपंचपती जळगाव एसीबीच्या जाळ्यात


Warsade Grampancyat ACB TRAP पाचोरा : रोजगार सेवकाला मानधनापोटी देण्यात येणार्‍या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या पाचोरा तालुक्यातील वरसाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह सरपंच पतीला जळगाव एसीबीच्या पथकाने ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मंगळवार, 24 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यशस्वी झालेल्या सापळ्यात काशीनाथ राजधर सोनवणे (52, रा.प्लॉट नं.3, शिवनेरी नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) व महिला सरपंच पती शिवदास भुरा राठोड (67, रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांना अटक करण्यात आली.

ग्रामपंचायत वर्तुळात उडाली खळबळ
41 वर्षीय तक्रारदाराने ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणार्‍या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले आहे. या कामापोटी त्यांना मानधन मिळणार होते मात्र त्यासाठी मिळणार्‍या धनादेशावर सही देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे ग्रामसेवक काशीनाथ सोनवणे यांनी महिला सरपंच पती शिवदास राठोड यांच्यासाठी सहा हजारांची लाच मागितली मात्र चार हजारावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे मंगळवार, 24 रोजी तक्रार नोंदवण्यात आली. मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा.कार्यालयात सापळा रचण्यात आला. आरोपी राठोड यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.

हेडफोनमुळे झाला घात : रेल्वे रूळ ओलांडताना जळगावातील तरुणीचा मृत्यू 

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग के.बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्दन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

दापोरा गावातील महिलेचा मृत्यू : चौघांविरोधात गुन्हा 


कॉपी करू नका.