Three lakhs in cash recovered from the custody of an adult carrying courier’s money : Incident in Jalgaon कुरीयरचे पैसे नेणार्‍या प्रौढाच्या ताब्यातून तीन लाखांची रोकड लांबवली : जळगावातील घटना


In Jalgaon, a cash bag of three lakhs was stolen by kicking a two-wheeler जळगाव : शहरातील कुरीयरच्या कार्यालयात काम करणार्‍या प्रौढाच्या ताब्यातील तीन लाखांची रोकड घेवून लुटारूंनी पोबारा केला. ही घटना प्रभूदेसाई कॉलनी रोडवरील नवसाचा गणपती मंदिराजवळ शुक्रवार, 22 रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. सोमवारी दुपारी जिल्हापेठ पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञातांचा पोलिसांकडून शोध
शहरातील पिंप्राळा रोड परीसरातील गुड्डूराजा नगरात प्रमोद विठ्ठल घाडगे (58) हे वास्तव्यास असून त्यांचा कुरीयरचा व्यवसाय आहे. शुक्रवार, 22 रोजी राजी दिनचर्या आटोपून ते रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच.19 पी.9521) ने घरी जाण्यासाठी निघाले परंतु भोईटे नगर रेल्वेगेट बंद असल्याने त्यांनी आपला रस्ता बदलवित प्रभूदेसाई कॉलनी रोडवरील नवसाचा गणपती मंदिराजवळून घर गाठण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वीच दुचाकी क्रमांक (3354) वरुन आलेल्या त्रिकूटांपैकी मध्यभागी बसलेल्या इसमाने प्रमोद घाडगे यांच्याजवळील बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. घाडगे यांनी त्याला प्रतिकार केला असता, त्या इसमाने घाडगेंच्या दुचाकीला लाथ मारताच प्रमोद घाडगे हे दुचाकीवरुन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पडले. व त्यांच्या हातातील तीन लाख रूपये ठेवलेली बॅग चोरट्यांनी लांबविली.

दोन दिवसांनी पोलिसात गुन्हा
या घटनेत घाडगे गंभीर जखमी झाल्याने परीसरातील नागरीकांनी त्यांना तत्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी सोमवार, 25 जुलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गिरीश महाजन म्हणाले : एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक


कॉपी करू नका.