Rajni Kharare भुसावळातील पोलिसांच्या कामात अडथळा : रजनी खरारे यांना अंतरीम जामीन


Interim bail for Rajni Kharare in Bhusawal Police Work भुसावळ : हद्दपार असताना आदेशाचे उल्लंघण करीत शहरात आलेल्या खरात बंधूंना पकडण्यासाठी समता नगरात शहर पोलिस पोहोचल्यानंतर रजनी रवींद्र खरात यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करीत महिला पोलिस कर्मचार्‍यास धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी खरात बंधूंसह रजनी खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात रजनी खरारे यांनी भुसावळ सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्या.आर.एम.जाधव यांनी 15 हजारांच्या जात मुचलक्यावर 8 ऑगस्टपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला आहे. संशयीत आरोपीतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल यांनी बाजू मांडली. तपास उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.

भुसावळ तालुक्यात पंचायत समितीच्या माजी सभापतींसह सदस्यास आरक्षणाने धक्का




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !