Jalgaon Local Incident Police Inspector Kirankumar Bakale Final Call जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर निलंबित
Jalgaon Local Incident Police Inspector Kiran Kumar Bakale Final Call जळगाव : पोलिस कर्मचार्याशी बोलताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरत वक्तव्य केले होते. याचे पडसाद बुधवारी उमटल्यानंतर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर-पाटील यांनी बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास बकाले यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान जळगाव विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा आता बकाले यांची विभागीय चौकशी करणार आहेत.
आमदारांनी केली होती निलंबनाची मागणी
आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली तसेच बडतर्फ करण्याचीही आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. मागणी मान्य न झाल्यास मराठा समाजाचा महामोर्चा काढण्याचा ईशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी आ. चव्हाण यांच्यासोबत संवाद साधत बकाले यांचे बुधवारी रात्रीतून निलंबनाचे आदेश काढून डीई (खाते निघाय चौकशी) लावतो, असे आश्वासन दिले होते. आयजी बीजी शेखर यांनी बकाले यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे शांततेचे आवाहन
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी जिल्हावासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा पोलीस प्रशासन कुठल्याही जातीवादी व्यक्तीला वा प्रवृत्तींना थारा घालत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन होणार : आयजी बी.जी.शेखर पाटील
मोठी बातमी : जळगाव गुन्हे शाखेने निरीक्षक किरणकुमार बकाले ‘नियंत्रण कक्षात जमा’
