Big News : Heroin worth Rs 1800 crore seized in Mumbai मोठी बातमी : 1800 कोटी रुपयांचे हेरॉईन मुंबईत जप्त


Big News : Heroin worth Rs 1800 crore seized in Mumbai मुंबई : दिल्ली पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी जप्तीची कारवाई मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरावर केली असून एका कंटेनरमधून तब्बल 1800 कोटींचे हेरॉईन जप्त केले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काही दिवसांपूर्वी दोन अफगाण नागरीकांना अटक केल्याने नार्को टेररचा पर्दाफाश झाला होता. संशयीतांच्या सांगण्यावरुन स्पेशल सेलच्या पथकाने 1200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले तर दोन्ही परदेशी नागरीकांची बराच वेळ चौकशी झाल्यानंतर मुंबई बंदरातील कंटेनरमध्येही अंमली पदार्थ असल्याचे उघड झाले.

20 टन हेरॉईन जप्त
या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक दोन्ही आरोपींना घेऊन मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पोहोचले आणि तेथे छापा टाकून एका कंटेनरमधून 20 टनहून अधिक हेरॉईन जप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच आतापर्यंतची ही सर्वात मोठी हेरॉईन जप्ती आहे. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत अंदाजे 1800 कोटी रुपये आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रग्जच्या खेपाचे तार नार्को टेररशी संबंधित आहेत. दिल्ली पोलिसांचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या टीममध्ये एसीपी ललित मोहन नेगी, हृदय भूषण आणि इन्स्पेक्टर विनोद बडोला यांसारख्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. या पथकाने 20-21 या वर्षात सर्वाधिक ड्रग्ज पकडले असून त्यात सर्वाधिक प्रकरणे नार्को टेररची आहेत.

दिल्ली पोलिसांच्या कारवाईने खळबळ
आश्चर्याची बाब म्हणजे, मुंबई बंदरात हेरॉइनने भरलेल्या कंटेनरची नार्कोटिक्स ब्युरो आणि डीआरआयच्या पथकाने अनेकदा तपासणी केली. मात्र, या ड्रग्जच्या मालाबाबत ते अनभिज्ञ राहिले. पण, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्या कंटेनरमधूनच ड्रग्जची खेप जप्त केली आणि तो कंटेनर दिल्लीत नेला.

 


कॉपी करू नका.