Even those who laugh make us Cry : Comedian Raju Srivastava Passes Away हसणार्‍यानेही जाता-जाता रडवले : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

0

Even those who laugh make us Cry : Comedian Raju Srivastava Passes Away नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (58) यांची गेल्या गेली 40 दिवस मृत्यूशी झुंज अखेर बुधवारी संपली. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण आयुष्य लोकांना हसवण्यात घालणार्‍या श्रीवास्तव यांच्या निधनाने मात्र प्रेक्षकांना रडवले.

नोएडा फिल्म सिटीचे स्वप्न अपूर्ण
राजू यांचे शेवटचे स्वप्न उत्तर प्रदेश, बिहार चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावणार्‍या या प्रांतातील कलाकारांनी अभिनय विश्वात नाव कमवण्यासाठी मुंबईची गरज भासू नये. त्याच्यासाठी नोएडामध्ये उभारली जाणारी फिल्म सिटी ही या सगळ्या समस्येवरील तोडगा होती. यामुळेच ते ‘नोएडा फिल्म सिटी’चे स्वप्न पाहत होते.

वयाच्या 58 व्या वर्षी निधन
राजू यांच्यावर एम्स रुग्णालयात मोठ्या डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू होते. मात्र या उपचारांना यश आले नाही. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थितपणे पोहोचत नव्हता, हेच त्यांच्या मृत्यूचे मोठे कारण ठरले. सातत्याने मेनुअल ऑक्सिजन सप्लाय केल्यामुळे मेंदूतील पेशी स्वत: काम सुरू करतील, अशी डॉक्टरांची अपेक्षा फोल ठरली. राजू यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.


error: Content is protected !!