Akola ATS Raid in Jalgaon : One Suspect Detained अकोला एटीएसची जळगावात छापेमारी : एक संशयीत ताब्यात


Akola ATS Raid in Jalgaon : One Suspect Detained जळगाव : देशभरात छापेमारी सुरू केली असून महाराष्ट्रातून आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली असतानाच जळगावच्या मेहरुणमध्येही एकाला ताब्यात घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (32, रा.रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) असे ताब्यातील संशयीताचे नाव असून त्यास ताब्यात घेतल्याबाबत पोलिस दप्तरी रीतसर नोंदही करण्यात आली आहे.

प्रार्थना स्थळाजवळून घेतले ताब्यात
अकोला एटीएसने जळगावमधील मेहरूण परीसरातून तिघांना ताब्यात घेतले होते मात्र यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले तर जालन्याच्या अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (32, रा.रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) यास ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो काही दिवसापासून जळगावात लपून बसलेला होता व तो पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे.

11 राज्यांमध्ये आतापर्यंत छापे
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) देशभरात छापे टाकत असून हे छापे पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित लोक आणि ठिकाणांवर टाकले जात आहेत. एनआयएनं देशातील 11 राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 106 लोकांनाही अटक करण्यात आली. केरळमधून सर्वाधिक 22 जणांना अटक केली आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 20-20 जणांना अटक करण्यात आली. दहशतवादी फंडिंग, प्रशिक्षण शिबिरे आणि लोकांना संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या लोकांवर छापे टाकले जात आहेत.

2006 मध्ये स्थापना
22 नोव्हेंबर 2006 रोजी तीन मुस्लिम संघटनांच्या एकत्रीकरणातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये केरळची नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तामिळनाडूची मनिता नीती पसाराय यांचा समावेश होता. पीएफाय स्वतःला एक ना-नफा संस्था म्हणून ओळख सांगते. संस्था पीएफआयमधील सदस्यांच्या संख्येची माहिती देत नाही. 20 राज्यांमध्ये त्यांची युनिट्स असल्याचा दावा आहे. सुरुवातीला, पीएफआयचे मुख्यालय केरळमधील कोझिकोड येथे होते, परंतु नंतर ते दिल्लीला हलविण्यात आले. जच- सलाम हे त्याचे अध्यक्ष आणि एच् अब्दुल रहिमन हे उपाध्यक्ष आहेत.


कॉपी करू नका.