डोंगरकठोरा शेत शिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी : यावल पोलिसात गुन्हा दाखल

0

यावल : यावल तालुक्यातील डोंगरकोठारा शेत-शिवारात शेतकर्‍यांना विद्युत कनेक्शन देण्याकरिता खांबांवर टाकण्यात आलेले लघू दाबाचे तार चोरी झाले आहे. तब्बल 600 मीटर लांबीचे इलेक्ट्रिकल अ‍ॅल्युमिनियम तार चोरी झाले असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चोर्‍या वाढल्या : शेतकरी त्रस्त
डोंगरकठोरा, ता.यावल या गावातील शेतकरी सत्यजीत रवींद्रनाथ झांबरे यांच्या शेत गट क्रमांक 945 मध्ये शेतात राज्य विद्युत वितरण कंपनीचे 100 के.व्ही.ए. चे रोहित्र लावले होते व तेथून शेतकर्‍यांना खांब टाकून शेत विहिरीसाठी कनेक्शन दिले होते. या खांबावरील लघू दाबाचे अ‍ॅल्युमिनियम तार मध्यरात्रीनंतर कोणीतरी अद्यात चोरट्यांनी चोरी केले. तब्बल 600 मीटर लांबीचे व 15 हजार रुपये किंमतीचे सदर तार चोरी झाले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ उमेश बाळू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.


कॉपी करू नका.