Uddhav Thackeray’s Dussehra gathering at Shivaji Park! शिवाजी पार्कवरच होणार उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा


Uddhav Thackeray’s Dussehra gathering at Shivaji Park! मुंबई : शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असून हायकोर्टाच्या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये आनंद पसरला आहे. मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा अधिकार योग्य असल्याचे हायकोर्टाने म्हटले मात्र पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्ष सुरू आहे. सरकारकडून शिवाजी पार्कवर 45 दिवस कार्यक्रमासाठी राखून ठेवण्यात आल्याचे हाकोर्टाने आपल्या निकालात नमूद केले. आमच्या मते पालिकेनं अधिकाराचा गैरवापर केला आहे आहे, अशा शब्दात हायकोर्टाने मुंबई महापालिकेला सुनावले आहे.

याचिका फेटाळली
सदा सरवणकर यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली तर ठाकरे गटाच्या युक्तिवादाशी हायकोर्ट सहमत असल्याचे म्हटले आहे. खरी शिवसेना कोणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो निर्णय अजून प्रलंबित आहे त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा आजचा नाही, असेही कोर्टाने निकाल वाचण्यापूर्वी यावेळी स्पष्ट केलं.

ठाकरे यांचे वकील आस्पी चिनॉय यांचा युक्तिवाद
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नेमका कोणाचा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेसाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली. आमचे दोन अर्ज, 2016 पासून आम्हाला परवानगी, मग कुणीही उठून अर्ज कसा करतोय असा युक्तिवाद चिनॉय यांनी केला.

केवळ दोन वर्षांचा अपवाद
राज्य सरकारनं साल 2016 मध्ये अध्यादेश काढलेला आहे. ज्यात राज्य सरकारनं आम्हाला दस-याच्या दिवशी मेळावा घेण्याची रितसर परवानगी दिलेली आहे. अपवाद केवळ गेल्या दोन वर्षांच्या ज्यात कोरोनामुळे तो होऊ शकला नाही. शिवसेनेचे पदाधिकारी या नात्यानं अनिल देसाई यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. मात्र पालिकेनं कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव ती नाकारलीय.

पालिकेकडून वकिल मिलिंद साठेंचे स्पष्टीकरण
शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे. ते शांतता क्षेत्रात मोडतं. अर्ज कायद्याला अनुसरुनच फेटाळण्यात आला आहे. मेळाव्यातून सेना कुणाची हे सिद्ध होणार नाही. मेळावा झाल्यास कायद्याचा प्रश्न उद्भवेल. आम्ही कुणीचीही बाजू न घेता दोघांनाही परवानगी नाकारली आहे.


कॉपी करू नका.