Senior technician of Amalner Mahavitaran Company in Dhule ACB network वीज मीटर बदलण्यासाठी पाच हजारांची लाच अमळनेरच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला भोवली : धुळे एसीबीने दिला कारवाईचा शॉक


Senior technician of Amalner Mahavitaran Company in Dhule ACB network अमळनेर :  महावितरण कंपनीचे वीज मीटर बदलण्यासाठी दहा हजारांची लाच मागून तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या अमळनेर येथील वरीष्ठ तंत्रज्ञ भरत कैलास पाटील यास धुळे एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयीताला जळगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सापळा रचून तक्रारदाराच्या घरातूनच केली अटक
अमळनेर शहरातील तक्रारदार यांच्याकडील घरगुती मीटर गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडल्याने सरासरी बिल त्यांना येत असतानाही त्यांच्याकडून नियमित वीज भरणा करण्यात येत होता मात्र सुमारे 10 दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख हे तक्रारदाराकडे आल्यानंतर त्यांनी वीज मीटरची पाहणी केली. त्यानंतर याच कार्यालयातील वरीष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील आले व त्यांनी वीज मीटर बदलण्यासाठी दहा हजार रुपये लागतील अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे धमकावत तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली.

राहत्या घरातच स्वीकारली लाच
मंगळवारी तक्रारदार यांच्याकडे संशयीत आरोपी भरत पाटील आल्यानंतर त्यांनी पंचांसमक्ष लाच स्वीकारताच धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला अटक केली. दरम्यान, धुळे एसीबीने हा गुन्हा जळगाव एसीबीकडे अधिक तपासार्थ वर्ग केला असून संशयीत आरोपीला न्यायालयााने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन.एन.जाधव करीत आहेत.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रविण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.