मुक्ताईनगरात नवीन विश्रामगृहासाठी शासकीय इमारत बांधकामास मंजुरी

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना आले यश


मुक्ताईनगर : आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनित झालेले मुक्ताईनगर हे धार्मिक व पर्यटनस्थळ असल्याने बाहेरून येणार्‍या प्रवासी व पर्यटक तसेच भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता.

सव्वा सहा कोटींचा निधी मंजूर
यासाठी त्यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठका घेवून जागेचे स्थळ निरीक्षण, नकाशा तसेच अंदाज पत्रक तयार करणे आदी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सा.बां. विभागातर्फे या संदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला होता. तसेच आमदार पाटील यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली होती. त्यानुसार मंत्री चव्हाण यांनी मागणीला हिरवी झेंडी दिल्याने मुक्ताईनगर येथे नवीन शासकीय विश्रामगृह इमारत बांधकाम करणे (6.25 कोटी) मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.


कॉपी करू नका.