All the three accused who escaped from the custody of Nawapur police station are in jail नवापूर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पसार झालेले तीनही आरोपी जाळ्यात

नवापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पाच आरोपींना अटक करण्यात यश


All the three accused who escaped from the custody of Nawapur police station are in jail नवापूर : नवापूरातील लॉकअपमधून पसार झालेल्या तीन आरोपींच्या औरंगाबाद जिल्ह्यातून मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले आहे. आता अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली आहे.

दरोडा टाकण्याच्या तयारीत आरोपींना केली होती अटक
5 डिसेंबर 2022 रोजी रात्री सव्वाच्या सुमारास नवापूर तालुक्यातील नवरंग गेटजवळील कोठडा शिवारातील एमआयडीसीकडे जाणार्‍या रस्त्यावरील लॉकअपमधून संशयीत हैदरउर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण (20, कुंजखेडा, ता.कन्नड जि.औरंगाबाद), ईरफान इब्राहिम पठाण (35), युसूफ आसीफ पठाण (22), गौसखॉ हनीफखॉ पठाण (34, ब्राम्हणी गराडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद), अकिलखॉ ईस्माईलखॉ पठाण (22, रा.कठोरा बाजार ता.भोकरदन, जि.जालना) यांना दरोडा टाकण्याच्या तयारीत अटक करण्यात आली होती. आरोपींच्या ताब्यातून स्कार्पिओ (एम.एच.13 एन.7626) जप्त करण्यात आली होती.

लॉकअप तोडल्यानंतर दोघांना केली होती अटक
5 डिसेंबर 2022 रोजी 9.05 च्या सुमारास सर्व आरोपींनी नवापूर पोलिस ठाण्याच्या लॉकअपची मागील खिडकी तोडून पलायन केले होते. सायंकाळच्या सुमारास लॉकअप तोडून पळालेला हैदर ऊर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण यास गुजरात राज्यातील उच्छल गावाच्या परीसरातून अटक करण्यात आली होती तर 8 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकीलखाँ ईसमाईलखाँ पठाण यास मध्यप्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील खडकावाणी गावाच्या जंगलातून अटक करण्यात आली होती मात्र अन्य तीन संशयीत हाती लागत नव्हते.

औरंगाबाद जिल्ह्यातून तिघांना पकडले
लॉकमधून पसार झालेल्या तिघांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना करण्यात आले होते. पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड सारख्या तालुक्यात बातमीदारांचे जाळे तयार करुन आरोपी गौसखाँ, युसुफ पठाण, इरफान पठाण यांचे राहण्याचे निश्चित ठिकाण शोधून काढले. बुधवार, 28 डिसेंबर 2022 रोजीच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास संशयीत आरोपीतांच्या गावालगत असलेल्या जंगलातील शेतात गौसखाँ, युसुफ पठाण, इरफान पठाण यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या.

पथकाचा केला गौरव
बुधवार, 28 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या मासिक गुन्हे बैठकीत पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नवापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, नवापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक निलेश तांबे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, नवापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ तसेच नवापूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.