तीन गावठे कट्टे व सहा जिवंत काडतूसांसह नाशिकमधील तरुण जाळ्यात

शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई : घातपातापूर्वीच उधळला मोठा कट


Three village kattes and six live cartridges in a young net in Nashik शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी शस्त्र तस्करी करणार्‍या नाशिक जिल्ह्यातील सहा तरुणांच्या मुसक्या आवळल्या असून संशयीताकडून तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्यातील सत्रासेन-भोईटी मार्गावरून एका वाहनातून शस्त्र तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक सुरेश शिरसाठ यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. गुरुवार. 12 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील व कर्मचार्‍यांनी भोईटी-सत्रासेन नाकाबंदी केल्यानंतर संशयीत वाहन (एम.एच.15 टी.सी.5688) आल्यानंतर पोलिसांनी इशारा केल्यानंतर वाहन चालकाने वाहन न थांबवल्याने संशय वाढला व पोलिसांनी पाठलागाअंती वाहन अडवत झडती घेतली असता त्यातील सहा तरुणांकडे 75 हजार रुपये किंमतीचे तीन गावठी कट्टे, पाच हजार रुपये किंमतीचे मॅग्झीन, सहा हजार रुपये किंमतीचे सहा जिवंत काडतूस, एक लाख 80 हजार रुपये किंमतीचे सात मोबाईल तसेच पाच लाख रुपये किंमतीची चारचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी नाईक संदीप ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार संशयीतांविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या आरोपींविरोधात कारवाई
संशयीत आरोपी मोहित राम तेजवानी (21, रा.प्लॉट नंबर 10, ए विंग, गोदावरी कॉम्प्लेक्स, चिंचबन रोड, पंचवटी नाशिक), आकाश विलास जाधव (24, रूम नंबर 15, देहमंदिर सोसायटी, विसे चौक, गंगापूर रोड.नाशिक), राज प्रल्हाद मंदोरीया (21, प्लॉट नंबर 6, आव्हाड निवास, मधुबन कॉलनी, पंचवटी, नाशिक), अजय जेठा बोरीस (29, रूम नंबर 6, चैतन्य हाऊसिंग सोसायटी, रामवाडी, पंचवटी, नाशिक), श्रीनिवास सुरेंद्र कानडे (24, दिव्य दर्शन सोसायटी, विसे मळा, कॉलेज रोड, नाशिक), दर्शन चमनलाल सिंधी (21, होळनांथे, अजंदे बुद्रुक, ता.शिरपूर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट, पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, संदीप ठाकरे, संतोष पाटील, संजय भोई, प्रकाश भील, मुकेश पावरा आदींनी केली.

 


कॉपी करू नका.