नेपाळमध्ये विमान अपघात : मृतांची संख्या पोहोचली 68 वर


Plane crash in Nepal : Death toll rises to 68 नवी दिल्ली : यती एअरलाइन्सच्या विमानाला नेपाळात भीषण अपघात झाले असून या विमानातील आतापर्यंत 68 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या विमानात 5 भारतीयांसह 68 प्रवाशी व 4 क्रू सदस्य होते. ते राजधानी नेपाळहून पोखराला जात असताना विमानात बिघाड होवून ते डोंगराला धडकल्यानंतर दरीत कोसळले.

आतापर्यंत 68 प्रवाशांचा मृत्यू
प्रमुख जिल्हा अधिकारी टेक बहादुर के सी यांनी सांगितले की, आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. घटनास्थळावरील अत्यंत भयावह चित्र दिसून येत आहे. बचाव व मदत कार्य करणार्‍यांच्या माहितीनुसार, या अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीच्या मते, लँडिंगपूर्वी 10 सेकंद अगोदर या विमानात आगीचे लोट दिसून आले. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे घडल्याचे म्हणता येत नाही. यापूर्वी या अपघातासाठी खराब हवामानाला जबाबदार धरले जात होते.

5 भारतीयांसह 9 परदेशी नागरीक
कमल के सी हे या विमानाचे कॅप्टन होते. विमानातील 68 प्रवाशांत 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 1 आयरीश, 2 कोरियन, 1 अफगाणी व एका फ्रेन्च व्यक्तीचा समावेश होता. यात 3 नवजात बाळांसह व 3 मुलांचाही समावेश होता. एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी सांगितले की, आतापर्यंत एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आले नाही.

वैमानिकाने 2 वेळा मागितली लँडिंगची परवानगी
पोखरा एअरपोर्ट एटीसीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ही दुर्घटना रनवेपासून अवघ्या काही मीटर अंतरावर घडली. पोखराची धावपट्टी पूर्व-पश्चिम दिशेने आहे. पायलटने पूर्वेच्या बाजूने लँडिंगची परवानगी मागितली होती. त्याला ती मिळालीही होती. पण थोड्याच वेळात त्याने पुन्हा पश्चिम दिशेने लँडिंगची परवानगी मागितली. त्याला ती पुन्हा देण्यात आली. पण लँडिंगपूर्वी 10 सेकंद अगोदर हा विमान अपघात झाला.


कॉपी करू नका.