धुळ्यात महिलेचा खून : आरोपीच्या शिर्डीतून आवळल्या मुसक्या

धुळे शहर पोलिसांची कामगिरी : पोलिस अधीक्षकांनी जाहीर केले पारीतोषिक


Murder of a woman in Dhule : Smiles From The Accused धुळे : सुमारे पाच महिन्यांपासून सोबत राहणार्‍या महिलेचा रीक्षा चालक असलेल्या पतीने चारीत्र्याच्या संशयातून खून केल्याची घटना साक्री रोडवरील जमनागिरी भिलाटीत रविवारी सकाळी उघडकीस आली होती. संशयीत खूनानंतर पसार झाला असलातरी त्याच्या शिर्डीतून धुळे शहर पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. बादल रामप्रसाद सोहिते (नाहार, 40) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शहर पोलिसांच्या कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पथकाला पाच हजारांचा रीवॉर्ड जाहीर केला आहे.

चारीत्र्याच्या संशयातून केला खून
निता वसंत गांगुर्डे (30) ही महिला संशयीत बादल रामप्रसाद सोहिते (नाहार) सोबत गेल्या पाच महिन्यांपासून जमनागिरी रोडवर भाडे तत्वावरील घरात वास्तव्यास होते शिवाय लग्न करण्यासाठी मार्च 2020 पासून घरातून बाहेर पडली होती. संशयीत आरोपी बादल सोहिते हा निताच्या चारीत्र्यावर संशय घेत तिला मारहाण करीत होता मात्र शनिवार, 14 जानेवारी रोजी रात्री साडेदहा ते रविवार, 15 रोजी सकाळी सहा दरम्यान उभयंतांमध्ये वाद उफाळला व आरोपीने महिलेचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्यानंतर शिर्डी गाठले.

शिर्डीतून आवळल्या मुसक्या
खुनातील पसार आरोपी शिर्डीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी आरोपीच्या मुसक्या बांधल्या. ही कारवाई धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, कुंदन पटाईत, निलेश पोतदार, मनिष सोनगीरे यांनी केली.


कॉपी करू नका.