शिंगाडी ग्रामपंचायत सदस्य सीमा पाटील अपात्र


खिर्डी : रावेर तालुक्यातील शिंगाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील भामलवाडीतील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या सीमा योगेश पाटील यांनी शिंगाडी ग्रुप ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या रहिवास केल्याची तक्रार राजेंद्र माणिकराव पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे करीत त्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती. जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तक्रारीची चौकशी केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सीमा योगेश पाटील यांना 18 जानेवारी रोजी अपात्र केले आहे. संबंधित तक्रारदार राजेंद्र माणिकराव पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड.प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !