पेट्रोलच्या दरात 35 रुपयांची वाढ करताच संतप्त नागरीकाने लाहोरमध्ये पेट्रोल पंपच जाळला


Petrol pump burnt in Pakistan after fuel price hike इस्लामाबाद : पाकिस्तानी जनता महागाईने दिवसागणिक होरपळत असतानाच आता पेट्रोलच्या दरात तब्बल 35 रुपये वाढ करण्यात आल्यानंतर संतप्त नागरीकाने पेट्रोल पंपच जाळल्याची घटना लाहोरमध्ये घडली आहे. पाकिस्तानातील महागाई आणि कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे सरकार आणि जनता प्रचंड अस्वस्थ आहे. तिजोरी भरण्यासाठी शाहबाज सरकार जनतेवर कराचा बोजा वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 रुपयांनी वाढ केली असून या निर्णयामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

जाळपोळ केल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल
एका पाकिस्तानी नागरिकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संतप्त जमावाने पेट्रोल पंप पेटवताना दिसत आहे. या यूजरने सांगितले की, देशात पेट्रोलच्या दरात 35 रुपयांची वाढ झाल्याने लोक संतप्त झाले असून त्यांनी लाहोरमध्ये एका पंपाला आग लावली. या घटनेनंतर पंपातून धुराचे लोट दूरवरून दिसत होते.


कॉपी करू नका.