अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणार्‍या 28 वर्षीय महिलेचा पेपर कटरने खून : नंदुरबार तालुक्यातील दोघांना अटक


28-year-old woman killed with paper cutter for refusing to have immoral relationship :  Two arrested in Nandurbar taluka नंदुरबार : 28 वर्षीय महिलेने शारीरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या वादातून पेपर कटरने गळा चिरून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नंदुरबार तालुक्यातील कोळदे शिवारात सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

खून करीत मृतदेह फेकला
कोळदा शिवारातील नरोत्तम मुरार पाटील यांच्या शेतातील बाजरीच्या पिकात सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास 28 महिलेचा धारदार शस्त्राने खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबेख उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व नंतर पोलिसांनी ओळख पटवल्यानंतर संशयित बन्या सन्या पाडवी (55) यास अटक केल्यानंतर त्याने सोमवार, 1 मे रोजी दुपारी कटरच्या साहाय्याने खून केल्याची कबुली दिली. संशयिताला करण्यात आल्यानंतर मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दुसर्‍या आरोपीला अटक
सूत्रांच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी निधन झालेली 28 वर्षीय महिला दोन मुलांसह वास्तव्यास होती व दोन संशयिताबरोबर ती शेतात आल्यानंतर तिच्यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास दबाव टाकण्यात आला असता तिने नकार दिल्यानंतर आरोपीने पेपर कटरने तिच्या गळ्यावर वार करीत तिची हत्या करीत पळ काढला. सुरूवातीला या गुन्ह्यात बन्या पाडवी याला अटक करण्यात आली तर आणखी एक आरोपीचा सहभाग असल्याने त्याादेखील अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


कॉपी करू नका.