खरगोनजवळ 50 फूट उंच पुलावरून बस नदीत कोसळली : 15 प्रवाशांचा मृत्यू


Bus falls into river on 50 feet high bridge near Khargone : 15 passengers killed खरगोन : मध्यप्रदेशातील खरगोननजीक भरधाव बस पुलाचे रेलिंग तोडून थेट 50 फूट खोल नदीत कोसळल्याने 15 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 24 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान, 18 जुलै 2022 रोजी अमळनेर आगाराची अमळनेर-इंदौर बस नर्मदा नदीत कोसळून 12 प्रवासी ठार झाल्याची आठवण यानिमित्ताने पुन्हा झाली आहे. मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे हा अपघात घडला होता.

15 प्रवाशांचा जागीच मृत्यू
खरगोनचे एसपी धरमवीर सिंह यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 15 प्रवाशांचा मृत्यू ओढवला असून 25 प्रवासी जखमी आहेत. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही 15 प्रवाशांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. जखमींना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रवाशांचा आक्रोश मन हेलावणारा
मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये मंगळवारी सकाळी 8.40 च्या सुमारास प्रवासी वाहून नेणारी बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली. डोंगरगाव ते दसंगा दरम्यानच्या बोराड नदीच्या पुलाचा कठडा तोडून ही बस पुलाखाली कोसळल्याने 15 प्रवाशांचा मृत्यू झाला. याप्रसंगी प्रवाशांनी जिवांच्या आकांताने केलेला आक्रोश मन हेलावणारा आहे. खरगोनच्या बेजापूरहून इंदूरच्या दिशेने ही बस निघाल्यानंतर वेग अधिक असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली. नदी कोरडी असल्यामुळे बहुतांश प्रवाशांना दुखापत झाली. यबसमध्ये 40 हून अधिक होते प्रवाशी

मृतांच्या वारसांना चार लाखांची मदत
खरगोन बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मध्य प्रदेश सरकारने आर्थिक मदत घोषित केली आहे. त्यानुसार, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार व किरकोळ जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मध्य प्रदेश सरकारने जखमींवर मोफत मोफत उपचार करण्याचेही आदेश दिलेत.

 


कॉपी करू नका.