कर्नाटक निवडणूक निकालावर अशोक चव्हाण स्पष्टच म्हणाले : उपर वाले की की काठी में आवाज नही होती


congress leader ashok chavan commented on karnataka election result 2023 targets bjp double engine government fails
मुंबई :
कर्नाटक विधानसभेत भाजपाला मतदारांनी नाकारत काँग्रेसला पसंती दर्शवल्याने येथे सरकार बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू असतानाच महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर जोरदार निशात साधत डबल इंजिन रुळावरून घसरल्याचे सांगितले. काँग्रेसच्या या विजयामध्ये मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, डीके शिवकुमार, सिद्धरामय्या यांचा मोठा वाटा असून काँग्रेसच्या सर्व नेतृत्वानं यात आपल्याला झोकून दिलं आणि या विजयात सर्वांचा सिंहाचा वाटा असल्याचे चव्हाण म्हणाले.

काँग्रेसचा मतांचा टक्का वाढला
महाराष्ट्रातीलही अनेक सहकारी तिकडे जाऊन आले आहेत. या मतदानात काँग्रेसच्या मतांचा टक्काही वाढला आहे. काँग्रेसच्या जागा भाजपेक्षा दुपटीनं अधिक दिसतायत. काँग्रेसचा मताचा टक्के 43 टक्क्यांवर गेलाय. भाजपचा मताची टक्केवारी तितकीच राहिलीये. अनेक स्तरातून काँग्रेसला पाठिंबा मिळालाय हे उघड आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

देवधर्मही चालला नाही निवडणुकीत
चव्हाण म्हणाले की, भाजपनं अनेक ठिकाणी ध्रुवीकरण, तृष्टीकरण करून राजकारण कसं करता येईल हे पाहिलं. जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर मागे पडल्याचं त्यांना दिसलं, तेव्हा शेवटचं हत्यार म्हणून देवधर्म आणण्याचा विषय झाला. देवधर्म हे व्यक्तीगत आस्थेचे विषय आहेत. राजकारणाचा तो विषय होऊ शकत नाही हे कर्नाटकाच्या लोकांनी दाखवून दिलंय, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या ज्या लोककल्याणकारी योजना जाहिरनाम्यात देण्यात आल्यात त्या योजनांनाही लोकांनी प्रतिसाद दिल्याचं ते म्हणाले.

डबल इंजिन रुळावरून घसरलं
रोजगार, सुरक्षा, महागाई, शांतता असे अनेक लोकांसमोर प्रश्न होते. भाजप यावर काही बोलू शकले नाही. डबल इंजिन सपशेल रुळावरून घसरलंय हे स्पष्ट झालंय. उपरवाले की लाठी जब चलती है तो आवाज नहीं निकलती, अशी स्थिती झाली. एक्झिट पोलमध्ये जी आकडेवारी दिली त्यापेक्षाही अधिक जागा मिळेल असं वाटतं. वातावरण बदलतंय आगामी काळातही निवडणुकांत बदलांचा परिणाम दिसेल, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

 


कॉपी करू नका.