महाराष्ट्रात बंदी असलेले एच.टी.बी.टी कापसाचे 62 हजाराचे बोगस बियाणे जप्त


62,000 fake seeds of banned HTBT cotton seized in Maharashtra मालपूर : महाराष्ट्रात बंदी असलेले एच.टी.बी.टी कापसाचे 62 हजाराचे बोगस बियाणे जप्त करण्यात आल्याने मालपूरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाविरोधात दोंडाईचा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी विभागाचे भरारी पथकाने छापा टाकून शनिवारी दुपारी ही कारवाई केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिंदखेडा पंचायत समितीचे बियाणे निरीक्षक अभय नथु कोर यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या गुप्त माहितीवरुन येथील ग्राम पंचायत कार्यालयाजवळील पंढरीनाथ सदाशिव भोई यांच्या घरावर धाड टाकली. घरात विना परवाना साठवून ठेवलेला एच.टी.बी.टी. कापसाचा 62 हजार 40 रुपये किमंतीचा साठा जप्त करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
स्वतःच्या शेतात लागवडीसाठी हे बियाणे आणल्याची कबुली शेतकर्‍याने दिली आहे. प्रसंगी भरारी पथकाचे गुणवत्ता निरीक्षक नितेंद्र पानपाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज सिसोदे उपस्थित होते. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस स्टेशनला भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.