आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्री पदाचा दर्जा


MLA Bachu Kadu finally got ministerial status मुंबई : आमदार बच्चू कडू यांना मंत्री पद दिले जाणार असल्याचे आश्वासन गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्यानंतर विस्तार लांबतच गेल्याने आश्वासनपूर्ती होत नव्हती मात्र आता जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर त्यांना मंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार बच्चू कडू यांनी आभार मानले आहेत.

अखेर मंत्री पदाचा दर्जा बहाल
गेल्या 20 वर्षापासून आमदार बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. अखेर आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. मोठ्या संघर्षानंतर आता देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय सुरू झाले आहे. पण, ते दिव्यांग बांधवापर्यंत गेलं पाहिजे. ही संकल्पना आमचीच होती. त्या बांधवांची मागणी काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले आहे.


कॉपी करू नका.