देशाच्या समृद्धी आणि सामर्थ्याला नवी गती व बळ मिळणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

संसदेच्या नव्या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन


The country’s prosperity and power will get new momentum and strength : Prime Minister Narendra Modi नवी दिल्ली : संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांना अभिमानाने आणि आशेने भरून टाकणार आहे. आजचा दिवस आपल्या सर्व देशवासीयांसाठी अविस्मरणीय आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही दिव्य आणि भव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणासोबतच देशाच्या समृद्धी आणि सामर्थ्याला नवी गती आणि बळ देईल, असा आशावाद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले.

खासदारांसह राज्यपालांची उपस्थिती
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व 775 खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले. नव्या संसद भवनाच्या रविवारी होणार्‍या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अधिनामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शनिवारी सेंगोल (राजदंड) सुपूर्द केला. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. जवळपास 971 कोटी रुपये खर्चून बांधलेले, नवीन संसद भवन भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे.


कॉपी करू नका.