पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत कुर्‍हाडीने वार : कोळन्हावीतील आरोपी पतीला तीन वर्ष शिक्षा


Suspecting his wife’s character, stabbing him with an axe: The accused husband in Kolnhavi was sentenced to three years यावल : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत तिच्यावर कुर्‍हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे जुलै 2017 मध्ये घडली होती. या प्रकरणी यावल पोलिसात पतीविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर यावल न्यायालयात खटल्याची सुनावणी झाल्यानंतर यावल न्यायालयाने पतीला तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली व 10 हजारांचा दंडदेखील सुनावला.

अशी आहे खटल्याची पार्श्वभूमी
कोळन्हावी, ता.यावल या गावात कविता रवींद्र सोळुंके या विवाहितेवर 5 जुलै 2017 रोजी तिचे पती रवींद्र अवचित सोळुंके यांनी चारीत्र्यावर संशय घेत कुर्‍हाडीने वार केले. पाठीवर झालेल्या हल्ल्यानंतर विवाहितेला जळगाव जिल्हा रुणालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जळगाव रुग्णालयात विवाहितेचा जळगाव पोलिसांनी जवाब नोंदवला होता व पाच दिवसांनी यावल पोलिसात तो जवाब प्राप्त होत रवींद्र सोळुंके याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यास अटक करीत तत्कालीन पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अशोक आहिरे यांनी या गुन्ह्याचा तपास करीत यावल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आरोपीला तीन वर्ष शिक्षा
यावल न्यायालयात सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे यांनी न्यायालयात रवींद्र सोळुंके यांच्यावर दोष सिध्द करतांना एकूण सहा साक्षीदार तपासले व दोष सिध्द केला. यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांनी रवींद्र अवचित सोळुंके यास तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार रामकृष्ण पवार यांनी कामकाज पाहिले.

 


कॉपी करू नका.