वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व 48 जागा लढणार ; अॅड.प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
मुंबई : वंचित बहुजन आघाडी राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागा लढणार असल्याची घोषणा आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परीषदेत केली. ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याचे पत्र देण्यात आले आहे मात्र त्यावर अद्याप उत्तर नाही. लोकसभा निवडणुका कधीही होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
आघाडीत नाही जागा वाटपाचे सूत्र
राज्यात शिवसेना (ठाकरे गट) व वंचित आघाडीची युती आहे. परंतु शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाचे सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे शिवसेना व वंचित आघाडीतील जागावाटपाची चर्चाही थांबलेली आहे. लातूर, सातारा, बीड, सटाणा येथे सभा घेऊन निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करीत आहोत, असे आंबेडकर म्हणाले.


