धक्कादायक ! अधिग्रहित शेतात आंब्यांची झाडे लावून शासनाची फसवणूक ; जळगावातील चौघांविरोधात गुन्हा
Govt cheated by planting mango trees in acquired fields ; Crime against four in Jalgaon जळगाव : धरणासाठी जमीन अधिग्रहित केली असतांना शेतातून जास्तीचा मोबदला मिळविण्यासाठी आंब्यांची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील भागपूर शिवारातील शेत गट नंबर 8 मधील शेती हे भागपूर मातीच्या धरणासाठी आरक्षीत असतानाही शासनालाच फसवल्याचे समोर आले आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
जळगाव तालुक्यातील भागपूर शिवारातील शेतात शेत गट क्रमांक 8 मधील शेती हे महाराष्ट्र शासनाने भागपूर मातीच्या धरणासाठी अधिगृहित केली आहे. असे असतांना देखील शेतातील मोबदला जास्त मिळावा, यासाठी शेतात अंब्याची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याची बाब समोर आली.


अखेर पोलिसात गुन्हा
याप्रकरणी मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शासनाचे कर्मचारी हेमंत मुरलीधर गीरी यांनी नशिराबाद पोलि ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नेहा जितेंद्र अग्रवाल, जितेंद्र हनुमानदास अग्रवाल, निधी निखील पसारी, अनिता अनुप अग्रवाल (सर्व रा. आर.जे.टॉवर, भास्कर मार्केट, जळगाव) यांच्या विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अलियार खान करीत आहे.
