जळगावातील रबर कंपनीतून दिड लाखांचा मुद्देमाल चोरीला


जळगाव : एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीजमधून चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे एक लाख 55 हजारांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आली.

सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध
जळगाव शहरातील एमआयडीसी परीसरात एन-सेक्टरमध्ये मयूर हायटेक इंडस्ट्रीज नावाची रबर मोल्डिंग कंपनी आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक वायर तयार केली जाते. 5 ते 21 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटरचे लॉक तोडून कंपनीतून सुमारे एक लाख 55 हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक वायर इलेक्ट्रिक ग्राइंडर, लोखंडी मोल्ड व साचे लांबवले.



हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनी मालक जितेंद्र शांताराम बडगुजर (39, रा. भूषण कॉलनी, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यावरून गुरुवारी दुपारी दोन वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन मुंडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !