लग्नाच्या आमिषाने जळगावातील 18 वर्षीय तरुणीवर बलात्कार
An 18-year-old girl in Jalgaon was raped on the lure of marriage जळगाव : लग्न करण्याचे आमिष दाखवून शहरातील 18 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. 21 ऑगस्ट 2021 ते 7 ऑक्टोबर 2023 ठिकठिकाणी तरुणीवर बलात्कार करण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्यावरून अप्पू मिर्झा (23, समता नगर, जळगाव )याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन वर्ष केला अत्याचार
जळगाव शहरातील एका भागातील तरुणीशी संशयिताची ओळख झाल्यानंतर
संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरीक संबंध ठेवले व नंतर तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने प्रेमसंबंध असल्याचे जाहीर करण्याची धमकी दिली तसेच आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. 21 ऑगस्ट 2021 ते 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान शहरातील कोल्हे हिल्स पलोड शाळेमागे तसेच शहरातील विविध भागात बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.

