यावल येथे तालुकास्तरीय चित्रकला प्रदर्शनाला प्रतिसाद

यावल तालुक्यातील 38 शाळेतील 800 विद्यार्थ्यांचा सहभाग


यावल : आज ही अनेक विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मनातील भावना चित्राव्दारे मांडण्याची कला आहे व या कलेस ग्रामीण भागात एक चांगल व्यासपीठ कलाध्यापक संघाकडून उपलब्ध करून देण्यात आले व शालेय विद्यार्थ्यांमध्ये यातुन उत्सुकता निर्माण होते. यातून चित्रकलेतील मोठे कलावंत घडवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले. त्या यावल येथील साने गुरूजी विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. या स्पर्धेत तालुक्यातील 38 शाळेतील 800 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला होता व विजेत्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक एम.के.पाटील होते. उद्घाटन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस शालिग्राम भिरुड यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरपरीषदेच्या कक्ष अधीक्षक आरती खाडेे, कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष एन.ओ.चौधरी, कलाध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय पाटील, सचिव अरूण सपकाळे, चोपडा येथील ललित कला केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन, खिरोदा येथील सप्तपुट ललित कला भवनचे प्राचार्य अतुल मालखेडे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, माजी प्राचार्य शेख गनी, उपप्राचार्य ए.एस.इंगळे, पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर, योगेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रस्तावना तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे यांनी केली. सूत्रसंचालन अतुल महाजन तर आभार संतोष वानखेडे मानले. यशस्वीतेसाठी संघाचे अनिल वंजारी, हितेंद्र धांडे, संतोष वानखेडे, कैलास पवार सह तालुक्यातील सर्व कलाध्यापक मंडळींनी परिश्रम घेतले.

यांनी मिळवले बक्षीस
आठवी ते दहावी गटात प्रथम- शिवम पाटील (डोणगाव), द्वितीय- यश इंगळे, (फैजपूर), तृतीय क्रमांक निनाद कोल्हे, (न्हावी) उत्तेजनार्थ भुवनेश्वरी पाटील (यावल), निकिता चर्‍हाटे (साकळी), हर्षा चौधरी (दुसखेडा), इयत्ता 5 वी ते 7 वी गट प्रथम- चातुर्या पाटील (दहिगाव), व्दितीय प्रीती साळवे (भालोद), तृतीय- झिया फातेमा नसीर खान (साकळी) तर उत्तेजनार्थ हर्षदा कापडे (बामणोद), शेख तौफिक (यावल) व अजय लोंढे (हिंगोणा) यांनी बक्षीस पटककावले. या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, चषक देऊन सन्मानित करण्यात आले.


कॉपी करू नका.