भाजपकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी : राहुल गांधी कडाडले


BJP has a monopoly on corruption : Rahul Gandhi is tough मुंबई :  ‘आमचा लढा मोदींशी नसून अशा शक्तीविरोधात आहे, ज्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांना भाजपत जायला भाग पाडले,’ असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी येथे केला. भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी मुंबईत समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. इंडिया आघाडीची एकजूट दाखवण्यासाठी शिवाजी पार्कवर भव्य सभा घेण्यात आली. या सभेत राहुल गांधी यांनी भाजपकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. ती इलेक्टोरल बाँडमध्ये दिसून आली. पैसा द्या अन् कंत्राट घ्या, अशी पॉलिसी त्यांनी सुरू केलीय,’ असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर राहुल, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेनेचे (ठाकरे गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वंचितचे प्रकाश आंबेडकर, एम.के.स्टॅलीन, फारुक अब्दुल्ला, तेजस्वी यादव, मेहबूबा मुफ्ती, कल्पना सोरेन यांच्यासह 400 नेते व पदाधिकारी हजर होते.

राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये
राहुल म्हणाले, ‘राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्ससारख्या संस्थांमध्ये आहे. एका वरिष्ठ नेत्याने नुकतीच काँग्रेस सोडली. त्यापूर्वी त्यांनी माझ्या आईला सांगितलं की, ‘सोनियाजी, मला लाज वाटतेय. या शक्तींविरोधात लढण्याची माझी हिंमत नाही. मला तुरुंगात जायचे नाहीए…’ असे एक नव्हे हजारो लोक घाबरून टाकलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीचेही लोकही असेच गेले. या शक्तीने गळा पकडून त्यांना भाजपत पाठवले.


कॉपी करू नका.