प्री वेडिंग शुटसह लग्नातील डीजेवर बंदी

रावेरला चितोडे वाणी समाजाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय


Ban on DJing at weddings with pre-wedding shoots रावेर : चितोडे वाणी समाजाने नुकत्याच झालेल्या बैठकीत विवाहासह सर्व शुभकार्य वेळेवर व्हावेत, प्री वेडिंग बंद व्हावेत, लग्नवरातीत महिलांनी नृत्य करू नये, लग्नात डीजेचा वापर करू नये आदी निर्णय घेत समाजापुढे आदर्श पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला,

समाजाच्या बैठकीत विविध निर्णय
रावेर शहर व परिसरातील चितोडे वाणी समाजाची बैठक होऊन त्यात, अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष अशोक वाणी, चितोडे वाणी समाज अध्यक्ष निलेश पाटील, बालाजी महाराज संस्थान चेअरमन कैलास वाणी, विश्वस्त अशोक वाणी, शिरीष वाणी, अमोल पाटील, रावेर शिक्षण संवर्धक संघ चेअरमन डॉ. दत्तप्रसाद दलाल, पंच मंडळ अध्यक्ष अ‍ॅड. विपीन गडे, चिवास बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज श्रावक, चितोडे वाणी समाजाचे माजी अध्यक्ष महेश अत्रे, आदींच्या उपस्थितीत समाजबांधवांची बैठक होऊन त्यात सर्वानुमते हे मंजूर झाले. वरील सर्व विषय हे आपण स्वयं शिस्तीने, स्व जबाबदारीने व नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचे सर्वानुमते ठरले. अशोक का. वाणी, अमोल पाटील, अ‍ॅड.गडे, प्रमोद वाणी, गिरीश पाटील, प्रफुल सराफ, डॉ.मीनल दलाल, शुभांगी सुगंधिवाले, अर्चना पाटील, रोशन रावेरकर, चेतन वाणी, दिलीप वाणी, अंकुश सावदेकर, जयेश यावलकर, प्रशांत श्रावक, प्रशांत वाणी, सुनील वाणी, महेश गजेश्वर, उदयकांत वाणी, श्रीप्रसाद वाणी, वैभव कौशिक आदी उपस्थित होते.

बैठकीत या निर्णयावर एकमत
साखरपुडा, लग्न समारंभ, शुभकार्य वेळेवरच पार पाडावे
लग्नाच्या अगोदर होणारी प्री वेडिंग प्रथा बंद व्हावी
लग्नवरातीत किंवा मिरवणुकीत महिलांनी सामूहिक अथवा व्यक्तिगत नृत्य करू नये
लग्नातील आहेर देणे-घेणे बंद करावे
लग्नवरातीत डीजे लावू नये
अंत्ययात्रा ही दिलेल्या वेळेवर काढावी
अंत्ययात्रेला प्रत्येक घरातून किमान एका सदस्याने उपस्थिती द्यावी.

यांनी घेतले परिश्रम
बैठकीच्या यशस्वीतेसाठी चितोडे वाणी समाज अध्यक्ष निलेश पाटील, उपाध्यक्ष अमोल पाटील, सचिव चंद्रशेखर वाणी, सदस्य- महेश अत्रे, दिलीप वाणी, अंकुश सावदेकर, जयेश यावलकर, प्रशांत श्रावक, प्रशांत वाणी, सुनील वाणी, महेश गजेश्वर, उदयकांत वाणी, श्रीप्रसाद वाणी, वैभव कौशिक, गिरीश पाटील आदींनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.