राज ठाकरे यांची मोठी घोषणा : देशाच्या भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा

0

Raj Thackeray’s big announcement : Unconditional support to Prime Minister Narendra Modi for the future of the country मुंबई : मुंबईच्या शिवतीर्थावर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. देशाच्या भवितव्यासाठी सक्षम नेतृत्व हवे असल्याने केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अर्थात महायुतीला बिनशर्त पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर देखील टिकेचे बाण चालवले. तुमचा पक्ष फोडला म्हणून तुम्ही आरोप करता, पण सत्तेत असताना तुम्ही मलाई खाल्ली नाही का ? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला.

उद्योगपतींनी जावू नये देश सोडून
राज ठाकरे म्हणाले, माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरीका आहे ना जपान आहे. या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. 10 वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. तरुणांकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.

मराठी भाषेवर टोकाचं प्रेम करतो
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी जे ऐकत होतो. ते 5 वर्षात दिसत नाहीये. ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत ते पटलेल्या नाहीत. ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्याच कौतुक करणार नाही आवडल्या तर टीका करणार आहेच. माझा राग टोकाचा आहे. महाराष्ट्रातील लोकांवर, मराठी माणसावर , मराठी भाषेवर टोकाचं प्रेम करतो. मात्र, मला तशी गोष्ट दिसली नाही तर स्वत: विरोध करतो. 370 कलम रद्द झालं तेव्हा अभिनंदन केलं. ज्या गोष्टी चांगल्या घडल्या त्याच अभिनंदन केलं. ज्यावेळी एक माणूस एका प्रांताचा विचार करतोय नाही म्हटलं. मी कधीही व्यक्तीगत टीका करतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करतात. मी तशी केली नाही. मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी टीका करत नाही. तुम्हाला सत्तेत हाकलून दिलं म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात. तुम्हाला काय हवंय हे सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी मी आलोय.

हिंदूत्वासाठी महायुतीच्या सोबत : बाळा नांदगावकर
सभास्थळी दाखल झाल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हिंदुत्वासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो तर त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले. या आधीही शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत होतो, त्यामुळे आता जरी एकत्र आलो तर त्यात काही नवीन नसणार, असेही ते म्हणाले.

 


कॉपी करू नका.