चौकशांचा ससेमिरा ; व्यक्तीगत संपत्ती जप्त म्हणून खडसेंना जा म्हटले : शरद पवार

0

Sasemira of inquiries ; Sharad Pawar told to go to Khadse for confiscation of personal property पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे लवकरच घरवापसी अर्थात भाजपात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी संगितले की, खडसे यांच्या अनेक चौकशा सध्या सुरू आहेत. त्यांची व्यक्तिगत संपत्ती तपास यंत्रणांनी जप्त केल्याने त्यांना दैनंदिन कुटुंब चालवणेही अवघड बनल्याने ते हतबल झाल्यानेच त्यांना आम्ही तुम्हाला सोयीस्कर ठिकाणी वाटणार्‍या ठिकाणी जाण्यास सांगितले, असे राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार म्हणाले आहेत.

पवारांचा मोठेपणा : म्हणाले आमदारकी परत घेणार नाही
भाजपच्या मार्गावर असलेल्या खडसेंची विधान परिषदेतील आमदारकी आम्ही परत घेणार नाही कारण दिलेल्या गोष्टी आम्ही माघारी घेत नाही, असेही पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट करीत मनाचा मोठेपणा जोपासला. घरवापसी करणारे खडसे दोन दिवस पुण्यात शरद पवारांच्या भेटीसाठी थांबले असलेतरी त्याबाबत पवारांनी कुठलेही भाष्य केले नाही. खडसेंविषयी त्यांनी सहानुभूती व्यक्त करत त्यांना पक्षांतर करण्यास आम्हीच सांगितल्याचे ते म्हणाले.

अजित पवारांनी यावेळी पवार आडनाव असलेल्या उमेदवाराला बारामतीतून निवडून द्या, असे आवाहन केले आहे. त्याविषयी शरद पवार म्हणाले की, मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक आहे.

राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे. विजयसिंह मोहितेंच्या सहमतीनेच माढ्यातील नेते धैर्यशील मोहिते 14 एप्रिलला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आमच्याकडे प्रवेश करतील. लोकांमध्ये बांधिलकी ठेवायची असेल तर पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नाही असे लोकांना वाटत आहे. कशाचीही अपेक्षा न करता लोक आमच्याकडे येत आहेत, असा दावा शरद पवारांनी केला.


कॉपी करू नका.