देशात एकात्मतेसह शांतता नांदण्यासाठी प्रार्थना

यावलला रमजान ईद उत्साहात : सर्वधर्मीय बांधवांनी दिल्या शुभेच्छा

0

Prayers for peace and unity in the country यावल : यावल शहरात ईदगाह मैदानावर गुरूवारी सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली. सकाळ पासूनच ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्याकरीता मुस्लिम समाज बांधवांनी गर्दी केली होती तर देशात एकात्मता, अखंडता, शांतता व बळीराजाला सुगीचे दिवस येवो अशी सामूहिक दुवा पठण करीत मुस्लिम समाज बांधवांनी ईदची नमाज अदा केली. लोकप्रतिनिधींसह सर्वधर्मीय बांधवांनी येथे उपस्थिती देवून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळी सामूहिक नमाज पठण
शहरात चोपडा रोडवरील अक्सा नगरात इदगाह मैदान आहे. या मैदानावर दरवर्षाप्रमाणे मुस्लिम समाज बांधवांनी गुरूवारी सकाळी 9 वाजेला पवित्र रमजान ईदची नमाज सामूहिकरीत्या पठण केली. पवित्र रमजान अर्थात ईद-उल-फित्र ची नमाज पारंपारिक पध्दतीने मौलाना अब्दुल नबी हजरत यांच्या कुटुंबातील मौलाना शमीम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मौलाना हजरत अब्दुल हाफीस कादरी यांच्यामागे सामूहिकरित्या पठण करण्यात आली.

गुरुवारी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम समाज बांधवांनी नववस्त्र परिधान करून तसेेच शहरातील विविध मशिदीत ईमाम यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आली. नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधवांना ईदगाह मैदानावर रमजान ईदची शुभेच्छा देण्यासाठी रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष अनिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, असलम शेख नबी, हाजी गप्फार शाह, राष्ट्रवादीचे विजय पाटील, कदीर खान, फैजान शाह, अनिल जंजाळे, हाजी शब्बीर खान, भगतसिंग पाटील, विजय सराफ, हाजी हकीम खाटीक, नाना बोदडे, हाजी अय्याज खान, सईद शेख यांची उपस्थिती होती. देशात एकात्मता,अखंडता, शांतता व बळीराजाला सुगीचे दिवस येवो, अशी सामूहिक दुवा पठण करीत मुस्लिम समाज बांधवांनी इद साजरी केली. ईदगाह मैदानावर या नमाजचे आयोजन इदगाह कमिटीचे अध्यक्ष शेख हबीब शेख नसीर, उपाध्यक्ष हाजी शेख फारूख शेख युसूफ, सचिव शेख असलम शेख नबी, सदस्य हाजी गफ्फार शाह, करीम मन्यार, रईस खान, सैय्यद अन्सार अली, शरीफ खान, मो.इमाम शेख, शेख आलीम, एजाज पटेल आदींच्या वतीने करण्यात आले.


कॉपी करू नका.