मेहुणबारे येथे 18 लाखांचा गुटखा जप्त : पाच जणांविरोधात गुन्हा

0

Gutkha worth 18 lakhs seized in Mehunbare : Crime against five persons मेहुणबारे, ता.चाळीसगाव : नाशिक विशेष महानिरीक्षकांच्या पथकाने मेहुणबारे-धुळे महामार्गावर गुटख्याची तस्करी रोखत वाहनासह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री 11.35 वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्याकडून छत्रपती संभाजीनगरकडे अशोक लेलॅण्ड दोस्त वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती आयजींच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शकील अहमद, अजय महाजन, हवालदार मिलिंद पाटील, नाईक प्रमोद मंडलिक यांनी गुरुवारी रात्री 11.32 वाजेच्या सुमारास वाहन (एम.एच.20 जी.सी. 5573) ची तपासणी केली असता त्यातून 14 लाख 39 हजार 840 रुपये किंमतीचा विमन पामनसाला व चार लाखांचे वाहन मिळून 18 लाख 39 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
प्रमोद मंडलिक यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक गोपी अशोक मंडोरे (29, रा.दत्त मंदिरजवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, सध्या रा. नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) व विवेक बन्सीधर कुलकर्णी (40, रा. सिडको, वाळूज महानगर, गंगापूर) तसेच तर शंकर गरूड (राजापूर, वाळूज, एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर), व्यापारी संजय माटा आणि दिपीक वालिचा (दोघे रा.सेंधवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत. दरम्यान वाहन चालक मंडोरे व कुलकर्णी यांना अटक करण्यात आली.


कॉपी करू नका.