यावल तालुक्यात वादळी वार्‍यासह गारपीटीचा तडाखा : शेती पिकांचे नुकसान

0

Hailstorm with gale force winds in Yaval taluka : Damage to agricultural crops यावल : यावल शहर व तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपासून वादळी वार्‍यासह गारपीट झाली. विजेच्या कडकडाटासह 45 मिनिटे मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. वादळात साकळी येथील काही घरावरील पत्रे उडाली तर चुंचाळे, बोराळे परिसरात अनेक विद्युत खांब व वृक्ष कोसळले आहे. बोराळे गावातील श्रीराम मंदिरातील सुरू असलेल्या सप्ताहातील मंडप आणि पूजेच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. अचानक वादळी वार्‍यासह झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेती पिकांचे मोठे नुकसान
यावल शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक मेघगर्जाने सह वादळी वार्‍याला सुरुवात झाली. वादळी वार्‍यासह विजेचा कळखळाट झाला. गारपीटीसह मुसळधार पावसामुळे शेती क्षेत्रातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. वादळी वार्‍यात हरभरा, मका आदींचे देखील मोठे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे. शेती क्षेत्रामध्ये अनेक भागात मोठमोठे वृक्ष कोसळले आहे तर चुंचाळे बोराळे परिसरात अनेक ठिकाणी विद्युत खांब देखील कोसळले आहेत. महसूल प्रशासनाकडून तातडीने आता पंचनाम्याच्या सूचना करून पाहणी केली जावी, अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे बोराळे गावात श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आयोजित सप्ताहातील मंडप देखील उडून गेले. व पूजेच्या साहित्याचे व इतर साहित्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

भुसावळात पाऊस येताच वीज गुल
भुसावळ :
शहरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला पावसाचा जोर नसलातरी काही वेळातच जोरदार पावसाला सुरूवात झाली तर वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे लागलीच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तब्बल 25 मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस होताच वातावरणात गारवा निर्माण झाला. तीन आठवड्यांपासून तापमानाचा पारा चाळीच्या पार आहे. शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे पारा 37.8 अंशापर्यंत घसरला.


कॉपी करू नका.