रावेरात लोकसभा निवडणुकीच्या पूर्व कामकाजाचा जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा

0

A review of the pre-election activities of Rawer by the Collector रावेर : शहरात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देत लोकसभा निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेत कामकाजाची प्रशंसा केली. निवडणूक आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. रावेर लोकसभा निवडणुकीसाठी रावेर विधानसभा क्षेत्र अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी येथील तहसील कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांकडून कामाचे कौतूक
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नेमून दिलेले नियम लक्षात घेऊन व योग्य तयारी पाहून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद भारावले. त्यांनी प्रत्येक कक्षाला भेट देऊन माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देवयानी यादव, तहसीलदार बी.ए.कापसे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व निवडणूकीसाठी कामकाज करणार्‍या टीमची प्रशंसा केली. तहसील कार्यालयात निवडणूक पूर्व कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागात भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांकडून निवडणुकीबाबत करत असलेल्या कामकाजाबाबत माहिती घेऊन पाहणी केली. त्यानंतर सर्व सेक्टर अधिकारी व नोडल अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.

स्ट्राँग रूमची पाहणी
महाराष्ट्र-मध्यप्रदेश तालुका सीमा तसेच जिल्हा सीमा पाहणी करून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. रावेर येथील कामकाजाचा आढावा तहसीलदार कापसे यांनी दिला. सोबत अपर तहसीलदार मयुर कळसे, निवडणूक नायब तहसीलदार आर.डी.पाटील, तहसीलदार यावलसह तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी स्ट्राँग रूम तसेच सर्व कामकाजाचा समक्ष जाऊन पाहणी करून आढावा घेतला व समाधान व्यक्त केले.


कॉपी करू नका.